निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ संघाच्या निपाणी तालुका निपाणी विभागाची बैठक भास्कर स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये निपाणी विभागाच्या नूतन अध्यक्षपदी सदाशिव मारुती वडर, उपाध्यक्षपदी प्रकाश पाडुरंग कांबळे, महिला उपाध्यक्ष पदी सुनिता नरसिंगा प्रताप, सेक्रेटरीपदी परशुराम पाटील यांची निवड करण्यात आली.
सहाय्यक सेक्रेटरीपदी कावेरी खाडे, खजिनदारपदी सुरेश कोणे, सहाय्यक सेक्रेटरीपदी सुरेश शास्त्री, महिला सहाय्यक सेक्रेटरीपदी भारती माने यांची निवड करण्यात आली.
संजय मगदूम यांनी स्वागत केले. त्यानंतर नूतन पदाधिकां-याचा गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक, बीआरसी प्रमुख आर. ए. कागे यांच्या हस्ते सुकानू कमिटीतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळीआयुबखान पठाण, प्रकाश कल्लोळे, एन. जी. अत्तार, सुनील शेवाळे, सुनीता प्रताप, शिल्पा भुसाणी यांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीस जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष विनायक गुरव, संजय खामकर, निसार अत्तार, अजित गोरवाडे, रविंद्र तराळ यांच्यासह सुकाणू कमिटी सदस्य, तालुका शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि शिक्षक उपस्थित होते. बाबुराव मलाबादे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta