खानापूर (प्रतिनिधी) : नायकोल (ता. खानापूर) गावाच्या शिवारात हातातोंडाशी आलेल्या भात पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले आहे.
माणिकवाडी गावचे शेतकरी आपाणा गावडा यांची नायकोल गावाशेजारी असलेल्या भात पिकांत गविरेड्याच्या कळपाने घुसून प्रचंड नुकसान केले आहे.
गेल्या पंधरा दिवसापासुन सुगीच्या हंगामात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.
त्यात जंगली प्राण्याच्या गविरेड्याच्या कळपाने हौदोस घालुन नुकसान केले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी म्हणजे आगीतुन फोफाड्यात पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
याकडे तालुका प्रतिनिधीनी तसेच वनखात्याने लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाला झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा अशी मागणी या भागातील शेतकरी वर्गातुन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta