Wednesday , March 4 2026
Breaking News

खानापूर नगरपंचायतीत विधान परिषद निवडणूक मतदानास प्रारंभ

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या पंधरा दिवसापासुन विधान परिषद निवडणुकीचे प्रचाराचे वारे जोर वाहु लागले होते. काल पासुन वारे थंडावले शुक्रवारी दि. १० रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे.
खानापूर शहरातील नगरपंचायतीत मतदान बुथची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी मतदानाचा पहिला हक्क तालुक्यांच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर नगरपंचायतीतील मतदान बुथवर मतदानाचा हक्क बजावला.
खानापूर तालुक्यात एकूण ६४३ मतदार आहेत. त्यामध्ये पूरूष मतदार २९७ आहेत. तर महिला मतदार ३४६ आहेत.
तालुक्यात ५१ ग्राम पंचायतीच्या सभागृहात मतदान बुथची सोय करण्यात आली आहे. खानापूर शहरातील नगरपंचायतींच्या सभागृहात मतदान बुथची सोय करण्यात आली आहे.

शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासुन मतदान प्रक्रिया सुरू आहे.
केवळ ग्राम पंचायतीचे सदस्य व नगरपंचायतींचे नगरसेवक मतदान करणार आहेत. त्यामुळे मतदान केंद्रावर मतदाराची गर्दी दिसुन येत नाही. सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाचा वेळ आहे.
मात्र ग्राम पंचायतीच्या सदस्यातुन मतदान करण्याकडे उत्सुकता असलीतर वेळ काढण्यात जास्त रस दिसत आहे. एकंदरीत दुपारनंतरच मतदान करण्याकडे सदस्यांचा तसेच नगरसेवकांचा कल दिसत आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *