खानापूर : करंबळ आणि बेकवाड येथील यात्रा आटोपल्यानंतर रूमेवाडीतील आपल्या बहिणीची भेट घेऊन घरी परतणाऱ्या इसमाचा अपघातात मृत्यू झाला. नारायण भगवंत पाटील (वय 47, राहणार : माडीगूंजी ता. खानापूर) असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नंदगड येथील महात्मा गांधी हायस्कूल समोर हा अपघात घडला.
नारायण भगवंत पाटील हे आपल्या परिवारासह करंबळ यात्रेला गेले होते. तेथून त्यांनी बेकवाडला जाऊन लक्ष्मीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी रुमेवाडी येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीच्या घरी जाऊन तिची भेट घेतली आणि तेथून परत दुपारी 3 च्या दरम्यान आपल्या कांहीं नातेवाईकांना आणण्यासाठी ते पुन्हा बेकवाडला जात असता खानापूर बिडी रस्त्यावर नंदगड येथील महात्मा गांधी हायस्कूलसमोर त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.
बिडीहून खानापूरकडे येत असलेल्या, खानापूर-बिडी – खानापूर, या शटल बसची आणी त्यांच्या ओमनी व्हॅनची अमोरासमोर धडक बसली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी व एक मुलगा आहे.