

खानापूर : उत्तर कन्नड (कारवार) लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचा उद्या बुधवार दि. 17 रोजी खानापूर तालुक्यातील काही प्रमुख ग्रामपंचायतीना भेट देण्याचा दौरा होणार आहे. सकाळी 8 वाजता पहिली भेट निट्टुर ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांसाठी राहणार आहे. या ठिकाणी कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर इदलहोंड या ठिकाणी सकाळी 9.30 वाजता, सकाळी 10:30 वाजता हलकर्णी या ठिकाणी, सायंकाळी 6 वाजता गर्लगुंजी, रात्री 8 वाजता तोपिनकट्टी तर रात्री 9 वाजता बरगाव या ठिकाणी कोपरा सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्ते व मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांनी मतयाचना करणार आहेत. तरी संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी तसेच मतदाराने व पक्ष कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन ब्लॉक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
उत्तर कन्नड विभागातील भटकळ असून हल्याळपर्यंतच्या सर्व भागात त्यांना भरघोस पाठिंबा मिळत आहे. आता स्वतःच्या हक्काच्या खानापूर तालुक्यात मतांचा उच्चांक वाढवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने डॉ. अंजलीताई निंबाळकर खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटीगाठी घेत आहेत. खानापूर तालुक्यातूनही त्यांना भरघोस पाठिंबा व्यक्त केला जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta