Sunday , May 19 2024
Breaking News

नंदगड भागातून समितीच्या उमेदवाराला मताधिक्य देणार

Spread the love

 

खानापूर : नंदगड भागातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला असून कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई त्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.
बुधवारी समितीचे उमेदवार सरदेसाई यांच्या प्रचारासाठी नंदगड गावातील बाजारपेठ आणि इतर गल्लीमध्ये घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला व पत्रकांचे वितरण करण्यात आले. तसेच गंगाधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार सभा घेण्यात आली.

यावेळी खानापूर समितीचे सरचिटनिस आबासाहेब दळवी यांनी नंदगड भागातून नेहमी समितीला पाठबळ दिले जाते. संपूर्ण मराठी बहुल भाग असलेल्या खानापूर तालुक्यात समितीची ताकद कायम असणे गरजेचे आहे सातत्याने कन्नडसक्ती वाढत आहे. मराठी शाळा आणि संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा परिस्थितीत आपण स्वतःहून समितीच्या कार्यात सहभाग घेऊन पुन्हा एकदा समितीला गतवैभव मिळवून देण्यासाठी लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे आवाहन केले. उमेदवार निरंजन सरदेसाई यांनी बेळगाव तालुक्यासह जोयडा, कारवार, हलीयाळ मधील मराठा समाज आणि मराठी भाषिकातून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे समितीला चांगले यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
नंदगड विभाग समितीचे उपाध्यक्ष रमेश धबाले यांनी समितीच्या उमेदवाराला सर्वच भागातून मोठ्या प्रतिसाद मिळत आहेत. त्यामुळे समिती या निवडणुकीत आपली ताकत दाखवून देणार आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी समितीचा लढा सुरू राहणार आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांने आपली जबाबदारी ओळखून समितीला मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे आवाहन केले.
यावेळी समितीचे ज्येष्ठ पदाधिकारी पी के पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य पुंडलिक कारलगेकर, हलगा ग्राम पंचायत सदस्य रणजित पाटील, पीएलडी बँकचे संचालक नारायण पाटील, तुकाराम पाटील, कल्लाप्पा पाटील, चंद्रकांत बिडकर, रामाना कुरंगी, हनमंत पाटील, नंदू बिडकर, राजाराम देसाई, चापगाव कृषी पत्तीन सोसायटीचे चेअरमन उदय पाटील, प्रभू कदम, भास्कर पाटील, पुंडलिक पाटील, बाळकृष्ण पाटील, गजानन नारळीकर, आप्पांना ईसरान, विजय ईसरान, मुकुंद पाटील, सुनील पाटील, संदेश कोडचवाडकर, नागेश भोसले, भीमसेन करंबळकर, रामचंद्र गावकर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

चन्नेवाडी शाळा होणार सुरू : गटशिक्षणाधिकारी

Spread the love  बेळगाव : गेल्या सात ते आठ वर्षांपासून बंद असलेल्या चन्नेवाडी ता.खानापूर येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *