खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघातील ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच खानापूर तालुक्यातील महिलेला उमेदवारी दिल्यामुळे सर्वत्र नवचैतन्य पसरले आहे. डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी महाराष्ट्रातून येऊन खानापूर सारख्या दुर्गम भागात आपल्या समाजसेवेला सुरुवात केली. त्याचीच पोचपावती म्हणून खानापूरवासीयांनी त्यांना एकदा आमदार म्हणून निवडून दिले. पाच वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात भाजपचे सरकार असून देखील विरोधी बाकावर बसून डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी खानापूर तालुक्यात विकासाची गंगा आणली. याचीच पोचपावती म्हणून पक्षाने त्यांना यावेळची कारवार लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली. खानापूर तालुक्याला प्रथमच उमेदवारी मिळाल्यामुळे खानापूर तालुक्यातील जनता पक्षीय राजकारण बाजूला सारून डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
विधानसभा निवडणुकी वेळी काँग्रेसने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केलेली आहे. कारण लोकसभा मतदारसंघात लाखो महिलांना महिना दोन हजार रुपये गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत मिळत आहेत. लाखो कुटुंबीयांना वीज माफ झाले आहे. त्याचबरोबर बीपीएल कार्डधारकांना मोफत धान्य व रक्कम देखील देण्यात येत आहे. संपूर्ण कर्नाटक राज्यात दिवसागणित 35 लाखांवर महिला मोफत प्रवास करत आहेत त्यामुळे काँग्रेस सरकारने जाहीर केलेल्या योजना तात्काळ लागू केल्यामुळे जनतेत समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काँग्रेसची कार्यतत्परता व आश्वासनाची पूर्तता पाहता कारवार लोकसभा मतदारसंघातील जनतेने डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनाच आपला खासदार म्हणून दिल्लीत पाठविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे डॉ. अंजलीताई निंबाळकर या विक्रमी मतदान घेऊन विजयी होतील असा विश्वास काँग्रेस नेत्यांसह डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी देखील व्यक्त केला आहे.
कारवार लोकसभा मतदारसंघातून डॉ. अंजली निंबाळकर यांना मराठा समाजाचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. कारवार लोकसभा मतदारसंघात आठ मतदार संघ आहेत यापैकी सहा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे आमदार आहेत त्यामुळे या भागातील प्रत्येक गाव, खेड्यातून लाखोंच्या मताधिक्याने डॉ. अंजलीताई निंबाळकर या विजयी होतील यात शंकाच नाही.