खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे गुरूवारी (ता. ९) सकाळी ८ वाजता शिवजयंती निमित्त शिवस्मारक येथील छत्रपती शिवाजी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
सीमाभागात परंपरेप्रमाणे गुरुवारी शिवजयंती साजरी केली जाणार तसेच गेल्या काही दिवसांपासून शिवजयंती साजरी करण्याची तयारी सुरू करण्यात आली असून समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर शिवस्मारक येथे उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई व सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.