
खानापूर : नियती फाऊंडेशन आणि गुरुदेव फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 22 जुलै रोजी खानापूर न्यायालय आवारात डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेएमएफसी प्रधान दिवाणी न्यायाधीश विरेश हिरेमठ हे उपस्थित होते. यावेळी बसवराज हपळ्ळी, ऍड. आर. एन. पाटील यांच्यासह वकील वर्ग, न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. न्यायालयातील अनेक उपस्थितांनी या शिबिराचा लाभ घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta