Tuesday , December 9 2025
Breaking News

आमगावच्या महिलेला डॉ. अंजलीताई फाउंडेशनची मदत

Spread the love

 

खानापूर : मागील दोन दिवसांपूर्वी खानापूर तालुक्यातील आमगाव गावात हर्षदा घाडी नावाच्या महिलेला छातीत दुखत असल्याने सदर महिलेला मुसळधार पावसात गावकऱ्यांच्या सहकार्याने खांद्यावर उचलून रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ आली. खानापूरमधील असुविधांमुळे सातत्याने असे प्रकार पुढे येत असून घडल्या प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला. जन्म-मृत्यूशी झुंज देणाऱ्या महिलेला गावकरांनी सुमारे सहा किलोमीटर अंतर कापून आरोग्य केंद्रात दाखल केले. या महिलेवर बेळगावमधील रुग्णालयात उपचार सुरु असून खानापूर ब्लॉक काँग्रेस आणि डॉ. अंजली निंबाळकर फाउंडेशनच्या वतीने तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. सदैव समाजाची सेवा करणाऱ्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांना काही आर्थिक मदत करून त्यांना धीर दिला. यावेळी माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी कुटुंबियांना धीर देत त्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असण्याची ग्वाही दिली. यावेळी खानापुर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महादेव कोळी, खानापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष, काँग्रेस नेते ईश्वर घाडी, नेते सुरेश जाधव, डॉ. अंजलीताई फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *