खानापूर : नंदगड-हलशी रस्त्याच्या शेजारी चन्नेवाडी तलावाच्या वरील बाजूने पाण्याचा निचरा होण्यासाठी मारलेल्या चरीमध्ये नंदगड ग्राम पंचायतीने कचरा टाकल्याने चरीतुन पाणी तलावात मिसळत आहे. तलावातील पाणी शेतीसाठी तसेच गुरांना पाणी पाजण्यासाठी वापरले जाते, या कचऱ्यातून प्लास्टिक पिशव्या, बाटल्या तसेच पाण्यात न विरघळणारे साहित्य येत असल्याने गुरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, तसेच शेतीला जाणाऱ्या पाण्यातून प्लास्टिक कचरा जात असल्याने भातपिकाचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. हा प्लास्टिक कचरा तलावात जात असल्याने तलावात गाळ साचत आहे, तसेच डोंगराळ भागातून येणारे पाणी घणकचऱ्याला अडल्याने रस्त्यावर सुद्दा पाणी तुंबत आहे, तरी नंदगड ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन कचरा रस्त्याच्या बाजूला न टाकता आपल्या नियोजित जागेवर साठवावा, अशी मागणी चन्नेवाडी ग्रामस्थांतून होत आहे.