Wednesday , March 4 2026
Breaking News

हालात्री नदी पुलावरून वाहून जाणारा बचावला!

Spread the love

 

खानापूर : गोव्याहून हेमाडगा मार्गे खानापूरकडे आपल्या दुचाकीवरून येत असताना बेळगाव शहापूर येथील व्यक्ती विनायक जाधव या व्यक्तीने मणतूर्गा जवळील हालात्री नदीवरील पुलावर दुचाकी घातल्याने दुचाकीसह वाहून जात असताना नदीकाठावरील झुडुपातील फांदी पकडून धरली आणि आरडाओरडा करू लागला.

याबाबतची बातमी वाऱ्यासारखी पसरली असता खानापूर येथील अग्निशामक दलाची गाडी व नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते विनायक मुतगेकर, हारूरीचे काँग्रेस कार्यकर्ते विनोद पाटील (जीमवाले), पंडित ओगले यांच्या प्रसंगावधानामुळे जीव वाचला. विनोदनी ताबडतोब सुरेश जाधव यांचेशी संपर्क केला. सुरेश जाधव यांनी ताबडतोब सीपीआय खानापूर, तहसिलदार खानापूर, एसीएफ खानापूर, अग्निशामक दलाला कळवून लगेच मणतुर्गा येथील हालात्री पूलावर तोहीद चांदखन्नवर, वासू यशवंत बिरजे यांच्यासह घटनास्थळी पोहचले. यावेळी अग्निशामक जवळ असलेल्या व्यक्तीला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. परंतु स्प्लेंडर दुचाकी वाहून गेली.
सदर व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, जीव धोक्यात घालून दुचाकी पाण्यात घातल्याबद्दल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *