खानापूर (प्रतिनिधी): दहावीची परीक्षा होणार की नाही, अशा संभ्रमात असलेल्या विद्यार्थ्यांना सोमवारी दहावीची परीक्षा देण्याची संधी मिळाली. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांतुन परीक्षेची उत्सुकता लागुन राहिली आहे.
यंदा कोरोनाच्या महामारीमुळे दहावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेचे दडपण आले होते. गेल्या काही दिवसापासुन केव्हा होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष होते. शेवटी सोमवारी दि. १९ रोजी परीक्षेचा दिवस उजाडणार याबद्दल विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेची उत्सुकता लागुन राहिली आहे.
खानापूर तालुक्यात दहावीच्या परीक्षेसाठी ४२१४ विद्यार्थी सज्ज झाले आहेत.
कोरोनाच्या महामारीमुळे परीक्षेच्या काळात योग्य डिस्टन राहण्यासाठी एका रूममध्ये केवळ १२ विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आल्याने तालुक्यात दहावीची परीक्षा केंद्रातुन दुप्पटीने वाढ करण्यात आली. दरवर्षी १४ परीक्षा केंद्र असायची मात्र यंदा २३ परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
त्यामुळे आता दहावीची परीक्षा केंद्रे वाढली तशी परीक्षा वर्ग ही वाढले, यंदा एकूण ३७१ परीक्षा वर्ग करण्यात आले आहेत.
परीक्षा केवळ दोन दिवस होणार आहे. एकाच दिवशी तीन पेपर वेगवेगळ्या विषयाचे असुन पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी दि. १९ रोजी गणित, विज्ञान व समाज शास्त्र असे पेपर आहेत. तर गुरूवारी दि. २२ रोजी प्रथम भाषा, व्दितीय भाषा, तृतीय भाषा असे तीन पेपर घेण्यात येणार आहेत.
यावेळी तीन रंगात पेपर असुन सोमवारी पिंक कलरमध्ये गणित, ऑरेंज कलरमध्ये विज्ञान, तर ग्रीन कलरमध्ये समाज शास्त्र रंगाचे पेपर असणार आहेत.
तर बुधवारी पिंक कलरमध्ये प्रथम भाषा,ऑरेंज कलरमध्ये व्दितीय भाषा, ग्रीन कलरमध्ये तृतीयभाषा पेपर होणार आहे.
परीक्षा सकाळी १०.३० ते १.३० यावेळेत तीन तासात होणार आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी मास्क, सॅनिटाइजर, सोशल डिस्टन आदी नियमाचे पालन करावयाचे आहे.
भरारी पथकासाठी तसीलदार, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी व बीईओ अधिकारी अशी तीन पथके राहणार आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिस, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नर्स डाॅक्टर आदीची व्यवस्था करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी वेळेत परीक्षा केंदावर उपस्थित राहण्याचे आवाहन बीईओ लक्ष्मणराव यकुंडी यानी केले आहे.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …