खानापूर : खानापूर वनभागात राहणाऱ्या ग्रामस्थांनी सहमती दर्शवल्यास त्यांना इतरत्र हलविण्याचा निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री वनमंत्र्यांशी आधीच बोलले आहेत. शेकडो वर्षांपासून तेथे लोक राहतात, वनविभागाच्या कायद्यानुसार गावकऱ्यांनी सहमती दर्शवली तर ते कुटुंबाला 15 लाख रुपये देणार असल्याचे सांगितले, पाऊस कमी झाल्यानंतर खानापूर येथे जाऊन पुन्हा चर्चा करू.
Belgaum Varta Belgaum Varta