
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित डीएमएस पदवीपूर्व कॉलेज नंदगडमध्ये पीयुसी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात बारावी विद्यार्थिनींच्या ईशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन आणि महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले फोटो पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख कॉलेजच्या प्राचार्या दीपा हन्नूरकर यांनी करून दिली.
अभ्यासातील सातत्य, शिस्त व परिश्रम करण्याची तयारी ठेवल्यास यश नक्की मिळेल, असे मत कॉलेज सुधारणा कमिटीचे अध्यक्ष मारुती पाटील यांनी व्यक्त केले
कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीधर कदम, प्रा. बी. आर. देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमावेळी कॉलेज सुधारणा कमिटीचे सदस्य विठ्ठल गुरव, नारायण मोरे, सुदेश दलाल, अरुण पाटील, मधुकर पाटील, अरविंद काकतकर, प्रा. एम. एम. पूजार, प्रा. एन. व्ही. पाटील, प्रा. आय. पी. गावडे, प्रा. राणी मडवाळकर, दैनिक तरुण भारतचे पत्रकार महादेव हलशीकर, क्लार्क एम. टी. पाटील, मोहन धबाले, पीयुसी प्रथम आणि पीयुसी द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एम. आर. मिराशी यांनी केले आभार प्रदर्शन प्रा. एन. टी. पाटील यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta