खानापूर : खानापूर येथील मलप्रभा नदी घाटा नजीक एका अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यामध्ये तरंगताना आढळून आहे. प्रथमदर्शनी सदर मृतदेह पुरुष व्यक्तीचा असल्यासारखे दिसत आहे. परंतु मृतदेहाकडे जास्त निरीक्षण करून पाहिल्यानंतर सदर मृतदेहाच्या हातात बांगड्या दिसत आहेत. व अंगावर चॉकलेटी रंगाचा ब्लाऊज व साडी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मृतदेह महिलेचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांकडून सविस्तर माहिती मिळणार आहे.