खानापूर : खानापूर वार्ता आयोजित व जिजाऊ गणेश उत्सव मंडळ पुरस्कृत 2024 घरगुती मखर सजावट स्पर्धेचा आज बक्षिस वितरण समारंभ शिवस्मारक चौक येथे पार पडला.
गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेल्या घरगुती मखर सजावट स्पर्धेला तालुक्यातील प्रत्येक भागातून उदंड प्रतिसाद मिळाला असून स्पर्धेमध्ये 70 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यापैकी 10 जणांना 1 ते 10 अशी बक्षिसे देण्यात आली.
प्रथम क्रमांक बैलूर येथील हन्नुरकर यांनी पटकावला तर दुतीय क्रमांक विठ्ठल अळनावरकर बिदरभावी यांचा द्वितीय क्रमांक, तृतीय राजेश गावडे चोर्ला तर चौथा क्रमांक गोपाळ दळवी करंबळ यांनी पटकावला.
याचप्रमाने पाचवा क्रमांक श्रवण कुट्रे लालवाडी, सहावा निखिल पाटील तारवाड, सातवा विशाल सुतार निगापुर गल्ली, आठवा अभिषेक देसाई आसोगा, नववा नामदेव घाडी खानापूर तर दहावा क्रमांक लक्ष्मी पाटील होनकल यांनी पटकावला.
या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी होते. यावेळी या स्पर्धेत विषयी प्रास्ताविक खानापूर वार्ताचे संपादक प्रसाद रमेश पाटील यांनी करून कशा पद्धतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली याची माहिती दिली.
यावेळी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पिराजी कुराडे, कार्याध्यक्ष पत्रकार वासुदेव चौगुले, तरुण भारत चे प्रतिनिधी विवेक गिरी माजी तालुका पंचायत सदस्य महादेव घाडी, जय जिजाऊ गणेश मंडळाचे अध्यक्ष भूषण पाटील, उपाध्यक्ष अभी शहापूरकर, गॅरंटी योजना समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta