डी एम एस पदवीपूर्व कॉलेज नंदगडमध्ये पालक मेळाव्याचे आयोजन
खानापूर : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगांव संचलित डी एम एस पदवीपूर्व कॉलेजमध्ये पालक मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजनांने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या दीपा हन्नूरकर होत्या. त्या बोलताना म्हणाल्या की, किशोर वयात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनीना शारीरिक बदल, मानसिकतेत होणारे बदल, भावनिक, आर्थिक स्वावलंबन, निरोगी, किशोर वयासाठी घ्यावयाची काळजी, सोशल मीडिया व त्याचे विद्यार्थी जीवनावर होणारे परिणाम याविषयी सखोल माहिती व त्यावरील उपयावर मार्गदर्शन केले. तसेच आता पालकांनी आपल्या मुलांच्या सदोदित वर्तनाकडे लक्ष असावे व चुका दिसल्यास त्याबाबत त्यांच्याशी चर्चा करून त्याचवेळी त्यांना सल्ला देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक, विद्यार्थी संवाद खूप महत्त्वाचा असून चर्चा करणे अत्यावश्यक आहे. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी चारित्र्यसंपन्न बनले पाहिजे व चांगल्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजे. कार्यक्रमच्या शेवटी पालक, विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून आपल्या समस्यांचे निराकरण करून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी. आर. देसाई यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. एन. व्ही. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमावेळी प्रा. एम. एम. पूजार, प्रा .एन. टी. पाटील, प्रा. ईश्वर गावडे, प्रा. एम. आर. मिराशी, प्रा. एकनाथ पाटील, प्रा. राणी मडवळकर, महादेव हलशीकर, एम. टी. पाटील, मोहन धबाले, पालक मेळाव्यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींचे पालक उपस्थित होते.