खानापूर : गणेबैल टोलनाक्यावर सामान्य जनतेला अजून त्रास देणे चालूच आहे. आज गणेबैल टोलनाक्यावर एक जणांची गाडी अडविली. सदर व्यक्तीने मासिक पास दाखविला तरी सुद्धा गणेबैल टोलचालकांचा अरेरावीपणा चालूच होता.
शेवटी त्या सन्माननीय गृहस्थानी आपली गाडी आहे तिथेच टोलवर सोडून दुसऱ्या गाडीत बसून खानापूर गाठले.
सामान्य लोकांना त्रास द्यायचा आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना टोलमाफी द्यायची असा भीम पराक्रम गणेबैल टोलवाले करत आहेत. याआधी या सर्वावर गुन्हा दाखल झाला आहे परंतु पोलीस प्रशासन काहीही कारवाई करत नाही. टोलनाका प्रशासन, भाजप नेते व पोलीस प्रशासन यांची भलतीच युती झालेली दिसून येते. आणि या भ्रष्ट युतीमुळे तालुक्यातील सामान्य जनता व शेतकरी मात्र भरडला जात आहे.
या भ्रष्ट युती विरूद्ध लवकरच खानापूर काँग्रेस तर्फे आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद टोलनाका वाले व पोलीस प्रशासन यांनी घ्यावी.
Belgaum Varta Belgaum Varta