
खानापूर : मणतुर्गे येथे श्री. रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार कमिटीच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून मणतुर्गे येथे महिलांचा हळदीकुंकू समारंभ दि. 20 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सुप्रिया मारुती पाटील तर स्वागताध्यक्ष सौ. आश्विनी राजाराम गुंडपिकर या होत्या. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हळदीकुंकू कार्यक्रमाचे उद्घाटन निवृत्त मुख्याध्यापिका सौ. अरुंधती आबासाहेब दळवी यांच्या हस्ते, गणेशपूजन सौ. साधना बाळाराम शेलार यांच्या हस्ते,
तर श्री रवळनाथ पूजन सौ.समृद्धी गजानन गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. तर फोटो पूजन उपस्थित महिला मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अंकिता गौतम सरदेसाई या उपस्थित होत्या. सौ. अरुंधती दळवी यांनी संक्रांती सणाचे महत्त्व पटवून देत म्हणाल्या की, हळदीकुंकू हा कार्यक्रम मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत साजरा करण्यात येतो. हळदीकुंकूला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. संक्रांत सणाचे औचित्य साधून महिला घरोघरी हळदीकुंकू समारंभ साजरा करीत असतात. यावर्षी मणतुर्गे गावच्या ग्रामस्थ पंच कमिटी व रवळनाथ मंदिर बांधकाम कमिटीने महिलांसाठी हा हळदीकुंकू समारंभ आयोजित करून नारी शक्तीचा सन्मान वाढवून तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे. यावेळी कुमारी चित्रा बाबाजी गुंडपिकर हीने गुजरात येथे झालेल्या कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल तिचा ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी श्री रवळनाथ मंदिर बांधकाम करण्यासाठी महिलांनी उत्स्फूर्तपणे देणगी दिली. सौ. अरुंधती आबासाहेब दळवी यांनी रवळनाथ मंदिर बांधकामासाठी 11111 रू. सौ. शांता शांताराम पाटील 5451, सौ. साधना बाळाराम शेलार 5031, सौ. कोमल विश्वनाथ देवकरी 5001, सौ. सुजाता श्रीपती देवकरी 5001, सौ. रुपाली यलाप्पा मांगीलकर 2121, सौ. सुप्रिया मारुती पाटील 2100, कु. चित्रा बाबजी गुंडपिकर 2100, सौ. लक्ष्मी प्रकाश गुरव 11001, सौ. सत्यवा जोतिबा गुरव 1101, सौ. स्नेहल संजय गुरव 1100, सौ. उषा पुंडलिक देवलतकर 1019, सौ. स्नेहल गंगाराम चोर्लेकर 1011, सौ. भागीरथी बळवंत देसाई 1001, सौ. अनुराधा अरविंद शेलार 1001, सौ. स्वाती विजय पाटील 1001, सौ. निकिता नारायण देवलतकर 1001 तसेच इतर उपस्थित महिला वर्गाने प्रत्येकी 500 प्रमाणे देणगी दिली.
कार्यक्रमाला उपस्थितांचे स्वागत श्री. आबासाहेब दळवी गुरुजी यांनी तर प्रास्ताविक श्री. बाळासाहेब शेलार यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री. मारुती देवकरी यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन शांताराम पाटील यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta