Sunday , July 26 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनमध्ये सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

Spread the love

 

बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या पूनम नावगेकर यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी इयत्ता तिसरी ‘अ’तील विद्यार्थी वर्गशिक्षिका स्नेहल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली भित्तीपत्रके प्रदर्शन मांडले. तर अथर्व रमेश सांबरेकर याने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेशात आपले विचार व्यक्त केले. प्रमुख पाहुण्या पूनम नावगेकर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जीवन प्रवास कथन केला. नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, ज्याला अधिकृतपणे पराक्रम दिवस किंवा शौर्य दिन म्हणून ओळखले जाते, हा भारतातील एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे जो प्रख्यात भारतीय स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. ते भारतीय राष्ट्रीय सेना (आझाद हिंद फौज) चे प्रमुख होते. अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थिनी एकांती माणिक होनगेकर हिने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातील कथा व यांच्यावर कविताही सादर केली. यावेळी कार्यक्रमासाठी लेखनिक विशाल जाधव, श्वेता हदगल उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षण संयाजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत, शिक्षक वर्ग, विद्यार्थी हे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *