
खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगडची ग्रामदेवता श्री महालक्ष्मीदेवीची यात्रेला मोठ्या उत्साहाने सुरु झाली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नंदगड या ऐतिहासिक क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांची समाधी असलेल्या गावामध्ये सुमारे २४ वर्षांनंतर, ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीची यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आले असून आज ब्राह्मी मुहूर्तावर देवीचा विवाह सोहळा पार पडला. “श्री लक्ष्मी माता की जय” या घोषणेसह भाविकांनी नंदगडमधील श्री लक्ष्मी देवीच्या यात्रा महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

आजपासून रविवार पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
याप्रसंगी नंदगड यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष पाटील, सेक्रेटरी हणमंत पाटील, सुधीर कब्बूर, उपाध्यक्ष राजेंद्र कब्बूर, खेमानी पाटील, वल्लभ गुणाजी, सतीश मादर, कार्याध्यक्ष नागेंद्र पाटील, प्रमोद पाटील, राजू पाटील, प्रसाद पाटील, आर्थिक कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार अरविंद पाटील, दीपक पाटील, विनायक पाटील, सुहास कुंद्री, गणपती पाटील, यल्लाप्पा गुंडांनी, गजानन चव्हाण, अनिल सुतार, शंकर सोनवणे, रोहित गुरव, अशोक गोरे आदिंसह हजारो भाविक उपस्थित होते. अक्षतारोपण कार्यक्रमानंतर सध्या देवीला सवाद्य मिरवणुकीने गावात फिरवण्यात येत असून मानाच्या मंदिरांना भेटी दिल्या जात आहेत. शेकडो भाविकांचा उत्साहपूर्ण सहभाग असणाऱ्या या मिरवणुकीच्या माध्यमातून आज दिवसभर मानाप्रमाणे प्रत्येक गल्लीत ओट्या स्वीकारण्यात येणार आहेत. सदर यात्रोत्सव आजपासून सलग १२ दिवस म्हणजे येत्या २३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta