
खानापूर : खानापूर तालुका मल्टीपर्पज को- ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीची तिसरी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी चेअरमनपदी सौ. धनश्री कर्णसिंह सरदेसाई जांबोटीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तसेच व्हा. चेअरमनपदी संस्थेचे ज्येष्ठ संचालक खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे माजी अध्यक्ष श्री. रामचंद्र कृष्णाजी खांबले यांची निवड करण्यात आली. सुचक म्हणून श्री. सुरेश कृष्णाजी पाटील संस्थापक अध्यक्ष तर अनुमोदक म्हणून श्री. तानाजी आप्पाजी कदम सेवानिवृत्त अभियंते यांची निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे मावळते चेअरमन श्री. आबासाहेब नारायणराव दळवी राष्ट्रपती आदर्श शिक्षक, तसेच मावळते व्हा. चेअरमन श्री. हयात मुल्ला यांनी नुतन चेअरमन आणि व्हा. चेअरमन यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री. अर्जुन बेडरे, श्री. सयाजी आत्माराम पाटील माजी सभापती, श्री. परशराम नागाप्पा पाटील, श्री. मानाप्पा तानाप्पा राठोड माजी जिल्हा पंचायत सदस्य, सौ. वैष्णवी विजय गुरव, श्री. डॉ. वैभव भालकेकर, श्री. बाबुराव चव्हाण यांच्या उपस्थितीत ही निवड पार पडली. प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सेक्रेटरी श्री. शंकर गुरव यांनी केले आणि लिपीक सौ. बसेटकर यांनी उपस्थित संचालकांचे आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta