खानापूर (प्रतिनिधी) : येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिना दिवशीच क्रांतीवीर संगोळी रायण्णा स्मृतीदिन असतो.
या स्मृतिदिनानिमित्त नंदगड येथील संगोळी रायण्णा समाधी ठिकाणी दर्शनासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आदी राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
परंतु सध्या राज्यात वाढत असलेल्या कोरोना संर्सगाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालुन दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून क्रांतीवीर संगोळी रायण्णा समाधी दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरण आयुक्त मल्लेशी अप्पा यांनी दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४० हजारहुन अधिक झाली आहे. अशा परिस्थितीत संगोळी रायण्णा समाधी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या संख्येवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
यासंदर्भात नियमानुसार दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांची लसीकरण केल्याचे प्रमाणात पत्र दाखविणे बंधनकारक आहे. प्रत्येकाने तोंडावर मास्क, सोशल डिस्टन, आदि नियमाचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. यासाठी नंदगड ग्रामपंचायत, नंदगड पोलिस स्टेशन, याचे सहकार्य मोलाचे ठरणार आहे.
यावेळी क्रांतीवीर संगोळी रायण्णा स्मृतीदिन भाविकांनी वाढत्या कोरोनाचा ससर्ग लक्षात घेऊन आपण राहत्या घरीच क्रांतीवीर संगोळी रायण्णाची प्रतिमा ठेवून अभिवादन करावे. असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी नंदगड ग्रामपंचायत अध्यक्षा विद्या मादार, उपाध्यक्ष मन्सुर ताशिलदार, ग्राम पंचायत पीडीओ अनंत भिंगे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत पीडीओ अनंत भिंगे यांनी केले.