Saturday , December 13 2025
Breaking News

माजी आर्मिमेन संघटनेच्यावतीने वार्षिक दिन साजरा

Spread the love

खानापूर : डॉ सोनाली सरनोबत यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आर्मीमेन संघटना खानापूरने आपला वार्षिक दिन सोहळा आणि हळदी कुंकु सोहळा साजरा केला. सोनाली सरनोबत कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या होत्या.
संघटनेचे अध्यक्ष अमृत पाटील, गणपत गावडे सर, नगरसेविका मेघा कुंदरगी, मीनाक्षी बैलूरकर, कल्पना पाटील यांच्यासह माजी सैनिक व त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या.
डॉ. सोनाली सतनोबत यांनी महिलांचे महत्त्व आणि त्यांचे समाजातील योगदान याविषयी माहिती दिली. सैन्यदलात सेवा देणाऱ्या जवानांच्या पत्नींच्या बलिदानाबद्दल उद्गार काढले. एक सैनिक देशासाठी सर्व सामाजिक आणि कौटुंबिक आनंदाचा त्याग करतो, असे त्या म्हणाल्या. नियती फाउंडेशनच्या कार्याबद्दल आणि योगदानाबद्दलही त्यांनी माहिती दिली.
खानापूर येथील सैनिक भवनाची मागणी आपण पुढे नेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. संस्कृती आणि पाककला, स्वयंपाक आदी परंपरा जपण्यासाठी महिलांच्या योगदानाची माहिती यावर त्यांनी भर दिला.
त्यानंतर हळदी कुंकू हा कार्यक्रम झाला.

About Belgaum Varta

Check Also

आमदार हलगेकर साहेबांच्या पीएची नार्को टेस्ट करा : खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस

Spread the love  खानापूर : शिरोली ग्रा. पंचायतचे सदस्य कृष्णा गुरव व दिपक गवाळकर तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *