खानापूर : गर्लगुंजी येथील बिर्जे शेत सरकारी नाल्यावर वेंटेड डॅमचे काम त्वरित पूर्ण करा, अशा आशयाचे निवेदन ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक कृषी निर्देशक सतीश माविनकोप यांना देण्यात आले. गावातील 70 ते 80 एकर क्षेत्र पाण्याखाली येईल आणि लोकांच्या रहदारीचा प्रश्न सुटणार आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत हे काम ग्राम पंचायतीकडून घालण्यात आले होते पण ही कामे कृषी खात्याकडे येत असल्याने या कामाला वेळ झाला. काही तांत्रिक अडचणीमुळे ह्या कामाला विलंब झाल्याचे निर्देशक म्हणाले. तांत्रिक अडचणी दूर करून आपत्कालीन परिस्थितीवर हे काम करावे. जिल्हा पंचायतीकडून निर्देश घेऊन हे काम त्वरित करावे आणि शेतकऱ्यांना सहकार्य करावे. काम त्वरित पूर्ण न झाल्यास कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असे प्रसाद पाटील यांनी सांगितले.
यावेळी कृषी अधिकारी चिकमठ, युवा काँग्रेस अध्यक्ष साईश सुतार, दिगंबर खांबले उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta