Tuesday , March 3 2026
Breaking News

फणस खाण्यासाठी झाडावर चढलेल्या अस्वलाचा विद्युत तारांच्या स्पर्शाने मृत्यू

Spread the love

 

जोयडा : फणस खाण्यासाठी झाडावर चढलेल्या अस्वलाचा विद्युत तारांच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याची घटना जोयडा तालुक्यातील चापोली या ठिकाणी घडली आहे. सदर अस्वल 14 ते 15 वर्षाचे असून मादी जातीचे आहे.

जोयडा तालुक्यातील चापोली घाटामध्ये रस्त्यावर असलेल्या फणसाच्या झाडावर चढून फणस खात असताना झाडाच्या बाजूने गेलेल्या 11 के व्ही च्या विद्युत तारांचा धक्का अस्वलाला लागल्याने अस्वलाचा मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती जोयडा वन विभागाला मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *