Monday , September 21 2026
Breaking News

संतीबस्तवाड गावात कुराण जाळल्याच्या निषेधार्थ मुस्लिम बांधव रस्त्यावर…

Spread the love

 

बेळगाव : पवित्र कुराण जाळल्याच्या घटनेनंतर संतीबस्तवाड गावात तसेच बेळगावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.

या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजातील नागरिक आज संध्याकाळी रस्त्यावर उतरले असून दोषींवर त्वरित कारवाईची मागणी करून पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि अटक करण्यातील विलंबाबद्दल प्रश्न उपस्थित केला.

पोलिस आयुक्तांनी मुस्लिम समाजातील नागरिकांना आश्वासन देऊन सांगितले की आरोपींना दोन दिवसांत अटक केली जाईल. दरम्यान, संतप्त तरुणांनी तपासाच्या गतीबद्दल असमाधान व्यक्त केले आणि चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *