
खानापूर : तालुका खानापूर श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ येळ्ळूर संचलित श्री रवळनाथ हायस्कूल शिवठाण येथे पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष रोपण कार्यक्रम तसेच पर्यावरण स्वच्छ व संरक्षणाचे महत्त्व जंगले व वन्यजीव सूक्ष्मजीव कीटक यांचे पर्यावरणातील महत्त्व व योगदान या विषयावर विद्यार्थ्यांना ज्ञानात भर पडावी यासाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक टी. वाय. अळवणी सर होते. श्रीमती काजुनेकर मॅडम व शारीरिक शिक्षक श्री. पी. टी. चोपडे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री. एम. एस. कदम व बी. व्ही. पाटील यांनी विद्यार्थ्यांना चर्चासत्रामध्ये सहभाग घेऊन पर्यावरणावर प्रश्न विचारून त्यांचे ज्ञान तपासले. यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी चर्चासत्रात भाग घेऊन आपापले मनोगत व विचार मांडले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री. एन. व्ही. नाईक यांनी केले. शेवटी वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Belgaum Varta Belgaum Varta