Thursday , June 4 2026
Breaking News

सौंदत्ती यल्लमा डोंगरावरील पायाभूत सुविधांची विकास कामे त्वरित सुरू करा : मंत्री एच. के. पाटील यांची सुचना

Spread the love

 

बेळगाव : दरवर्षी लाखो भाविकांची आराध्य देवता असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवस्थान येथील पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे त्वरित सुरू करण्याच्या सूचना,कायदा, संसदीय कामकाज, कायदे आणि पर्यटन मंत्री एच.के. पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बेळगावला आलेल्या मंत्री एच के पाटील यांनी,आज शुक्रवारी यल्लमा डोंगरावरील व्यापक विकास आराखड्यासंदर्भात बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी, १०० कोटी रुपयांच्या विशेष अनुदान आणि प्रसाद योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या १८.३७ कोटी रुपयांच्या अनुदानातून करावयाच्या कामांबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

प्रसाद योजनेअंतर्गत दोन बहुउद्देशीय हॉल, शौचालये, बाथरूम, माहिती केंद्रे, कॅन्टीन, प्राथमिक आरोग्य केंद्र, कचरा व्यवस्थापन युनिट आणि डिजिटल माहिती फलक बसविण्याबाबत त्यांनी चर्चा केली. त्याचप्रमाणे, १०० कोटी रुपयांच्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत भाविकांसाठी दर्शन बारी संकुल, पार्किंग व्यवस्था, अन्नदासोह भवन, व्यावसायिक दुकाने, प्रशासकीय इमारत बांधण्याची योजना आखण्यात आली आहे.याची माहिती घेतली.मास्टर प्लॅनच्या अंमलबजावणीबाबत सौंदत्ती येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. एकंदरीत, भाविकांना देवी दर्शन, जेवण, पार्किंग, शौचालय व्यवस्था यासह कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सौंदत्ती यल्लमा डोंगरावरील व्यापक विकास आराखड्याची माहिती दिली.

जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, श्री रेणुका एल्लम्मा पर्यटन विकास मंडळाच्या अधिकारी गीता कौलगी, पर्यटन विभागाच्या सहसंचालक सौम्या बापट आणि विविध विभागांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बसथांबे व सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सहकार्याचे आवाहन

Spread the love  बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगावने शहरातील बसथांबे, पदपथ, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणांवरील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *