खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी परिसरासह नागुर्डा, तसेच पश्चिम भागात अवकाळी पावसामुळे एक महिना ऊसाची उचल उशीरा झाली.
त्याचा परिणाम झाल्याने सध्या तालुक्याच्या गर्लगुंजी परिसरासह नागुर्डा, तसेच पश्चिम भागातील शिवारात ऊसाला तुरे सुटले आहेत.
जानेवारी महिना संपत आला. तसा ऊसाची उचल करणे गरजेची होती. अवकाळी पावसामुळे तसेच साखर कारखान्याच्या टोळ्यांनी उशीर केल्यामुळे ऊसाना तुरे आले आहेत.
एकीकडे निसर्ग शेतकरी वर्गावर कोपला असतानाच अनेक साखर कारखाने टोळ्या वेळत पाठवत नाहीत. त्यामुळे खानापूर तालुक्यातील शेतकरी आडचणीत आला आहे.
एकीकडे शेतकरी अडचणीत आला असताना तालुक्यातील ऊसाची उचल लवकर व्हावी, अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे.
असे असताना ऊस तोड करणार्या टोळ्या ऊस उत्पादक शेतकरी वर्गाकडून जादा पैशाची मागणी केली जात आहे.
ऐकीकडे शेतकरी वर्ग अवकाळी पावसाने नुकसानीत आहे. तर त्यातच टोळींकडून जादा पैसा मागत आहेत. त्यामुळे शेतकरी वैतागला आहे. शेतकरीवर्गाच्या फडातील ऊसाला तुरे आले आहेत. त्याचा ऊस साखर कारखान्यांनी लवकर उचलण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून चर्चीली जात आहे.
Check Also
मातृभाषेतील ज्ञानामुळेच माणसाची समज विकसित : प्रा. रंगनाथ पठारे
Spread the love खानापूर : कोणतेही ज्ञान मातृभाषेतून नैसर्गिक आणि सहजरितीने देता येते. मातृभाषेतील ज्ञानामुळेच …