
खानापूर : मऱ्याम्मा देवीचा वार्षिक उत्सव उद्या मंगळवार दिनांक 10 व बुधवार दिनांक 11 जून असे दोन दिवस चालणार आहे. या अगोदर गावात चार मंगळवार पाळण्यात आले. हा पाचवा मंगळवार मूर्ग नक्षत्र सुरू झाल्यावर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी देवीची यात्रा भरते. या यात्रेची तयारी पूर्ण झाली असून मंदिरासमोर मंडप घालण्यात आला असून मंदिराला विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे. मनोरंजनासाठी पाळणे व खेळण्याची दुकाने थाटण्यात आली आहेत.
या अगोदर देवीच्या नावाने पाच वार पाळले जातात, यावर्षी सुद्धा 10 व 11 जून असे दोन दिवस यात्रोत्सव होणार आहे. त्यानिमित्त मंगळवार दिनांक 10 जून रोजी, सकाळी 7.00 वाजता मऱ्यामादेवी ला अभिषेक व गाऱ्हाणे घालून यात्रेला सुरुवात होणार आहे. यानंतर दिवसभर देवीला ओठ्या व नैवेद्य अर्पण केला जाणार आहे. तर बुधवार दिनांक 11 जून 2025 रोजी, सकाळी 10:30 वाजता देवीला गाऱ्हाणे घालून सुरुवात होणार आहे. यानंतर दिवसभर नवस फेडण्याचा विधी सुरू राहणार आहे. यानंतर रात्री 10 वाजता उत्सवाची सांगता होणार आहे.
मऱ्याम्मा देवीला केवळ खानापूर शहरच नव्हे तर संपुर्ण खानापूर तालुक्यासह, बेळगाव व गोवा येथूनही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यात्रेच्या ठिकाणी खेळणी व इतर वस्तूंची विक्री करणारी दुकाने लावली जातात. भाविकांना व लहान मुलांना मनोरंजनासाठी यात्रेत खेळण्याचे पाळणे, सर्कस, वगैरे गोष्टींचे आयोजन केले जाते.
मंगळवार दिनांक 10 जून व बुधवार दिनांक 11 जून 2025, असे दोन दिवस यात्रा होणार असून, भाविकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमीटीने केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta