Sunday , December 7 2025
Breaking News

खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणेचा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा, विद्यार्थी व पालक मेळावा संपन्न

Spread the love

 

खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणेच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व विद्यार्थी-पालक मार्गदर्शन मेळावा दिनांक ८ जून २०२५ रोजी, स्व. सुषमा स्वराज बचट गट व प्रशिक्षण केंद्र, वडगांव खु. पुणे या ठिकाणी उस्फुर्तपणे पार पडला.

याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉ. संदीप साळवी तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरकारी वकील ॲड. श्री. एन. डी. पाटील, दुबईस्थित व मूळचे कुपटगिरीचे (ता. खानापूर) श्री. सोमनाथ पाटील आणि निष्णात डॉ. शीतल पाटील आदीसह मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील, संस्थापक अध्यक्ष पीटर डिसोझा, उपाध्यक्ष सुरेश हालगी, कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष नारायण गावडे, महिला कार्यकारिणी अध्यक्षा शीतल तवर, उपाध्यक्षा सुमेधा पाटील व उपाध्यक्षा ज्योती गुरव व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचबरोबर बीपीएलचे अध्यक्ष दत्ता भेकणे, माजी अध्यक्ष केदार शिवणगेकर, बीपीएलचे इतर संचालक केपीएलचे संचालक सचिन पाटील, रामदास घाडी, उद्योजक ज्ञानेश्वर गावडे, भगवंत चन्नेवाडकर, ज्ञानेश्वर पाटील आदी मंडळीही कार्यक्रमाला उपस्थित होते.

प्रारंभी राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीताने कार्कायक्रमाची सुरुवात करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. महिला संचालिकांनी स्वागतगीत सादर केले तर सचिव शिवाजी जळगेकर यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. त्यानंतर इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच एन डी पाटील, सोमनाथ पाटील व पीटर डिसोझा यांनी आपले विचार मांडले. प्रमुख मार्गदर्शक डॉ संदीप साळवी यांनी विद्यार्थी व पालकांना बहूमूल्य असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशराम निलजकर आणि श्रध्दा पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन सुमेधा पाटील यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे संचालक लक्ष्मण काकतकर, बाळासाहेब देसाई, परशुराम चौगुले, रामचंद्र निलजकर, नारायण पाटील, अशोक पाटील, बाळकृष्ण पाटील, रामचंद्र बाळेकुंद्री, पांडुरंग पाटील, राजाराम शिंदे , महिला संचालिका वनिता पाटील, प्रियांका पाटील, मनीषा पाटील, दिक्षा पाटील, रूपाली कवळेकर, तृप्ती गुरव, माया वाणी, संध्या कामती, सुवर्णा पाटील, विद्या पाटील, मनीषा नांदोडकर, स्नेहा हालगी, दीपिका काकतकर, शुभांगी देसाई, सुरेखा जळगेकर, स्मिता पाटील, धनश्री निलजकर, सुष्मिता पाटील, उमा निलजकर, स्वाती जांबोटकर, अश्विनी पाटील, पुजा पाटील, गीता बिडकर, प्राजक्ता देसाई, राजश्री करंदोळकर, रेणुका नाळकर आदीबरोबरच सदा गावडा, विठ्ठल पाखरे, शिवानंद चन्नेवाडकर, स्वप्निल देसाई, प्रभाकर जांबोटकर अशा अनेक सभासदांनीही अथक परिश्रम घेतले तर ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूर, सोमनाथ पाटील, ज्ञानेश्वर गावडे, संतोष गडकरी, नागेश वडगावकर, स्नेहल बडसकर, दीक्षा पाटील, तृप्ती गुरव, सुमेधा पाटील, राजाराम नांदोडकर, राजाराम करंदोकर, उमेश निलजकर, शिवानंद चन्नेवाडकर, तुकाराम पाटील, स्नेहा हलगी, ज्योती वीर, केदार शिवणगेकर, गणपती पाटील, शेखर दौलतकर, शिवाजी धामणेकर, मारूती गावडा, गणेश गुरव, मारूती कुलम, हणमंत यळ्ळूरकर आदींनी अर्थसहाय्य करून कार्यक्रमाला आर्थिक हातभार लावला.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरांतर्गत रस्त्याचा विकास आराखड्यानुसारच!

Spread the love  आमदार विठ्ठल हलगेकर यांची वकील संघटनेच्या शिष्टमंडळाला ग्वाही! खानापूर : खानापूर शहरांतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *