
खानापूर : 20 ते 22 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याची घटना आज सोमवार दिनांक 16 जून 2025 रोजी खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये घडली आहे. सर्वांना उपचारासाठी खानापूर येथील शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये राज्यातील विविध भागातील युवक पोलीस प्रशिक्षण घेत आहेत. काल रविवारी सुट्टी असल्याने ते जेवनासाठी बाहेर गेले होते. काही जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी जेवण केले. तर काही जणांनी आपल्या घरच्या डब्यातून आणलेले जेवण केले. मात्र, रविवारी रात्री काही जणांना जुलाब व उलटी तसेच ताप व डोके दुखीची सुरुवात झाली. त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना सोमवारी सकाळी खानापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
खानापूर येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू करण्यात आले आहेत. विषबाधित असलेल्या सर्वांना सलाईन व इंजेक्शन देऊन उपचार करण्यात येत आहेत. सर्वांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर व काही नेतेमंडळींनी शासकीय रुग्णालयात भेट देऊन विषबाधित पोलिसांच्या तब्येतीची चौकशी करून धीर दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta