
खानापूर : खानापूर तालुक्यात दोन-तीन दिवसांपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर-हेमाडगा मार्गावरील मनतुर्गा नजीक असलेल्या हालात्री नदी पुलावर जवळजवळ पाच फूट पाणी आले असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे वाहनधारक व प्रवासी वर्ग पर्यायी मार्ग म्हणून मणतुर्गा-असोगा-खानापूर या मार्गाचा वापर करीत आहेत.
काल दिवसभर व संपूर्ण रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मणतुर्गा नजीक असलेल्या हालात्री नदी पुलावर पाणी आल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. पर्यायी मार्ग म्हणून मणतुर्गा-असोगा-खानापूर या मार्गाचा वापर वाहनधारक करीत आहेत. परंतु खानापूर येथील रेल्वे स्थानकाजवळ असोगा रस्त्यावर रेल्वे मार्गाचे भुयारी काम सुरू आहे. त्या ठिकाणी पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूची माती ढासळत आहे. ताबडतोब यावर उपाययोजना केली पाहिजे अन्यथा हा मार्ग सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta