
खानापूर : खानापूरमधील तहसील कार्यालयासह उपनिबंधक कार्यालय आणि एम.सी.एच. रुग्णालयाला लोकायुक्त न्यायमूर्ती सी. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अचानक भेट दिली. या पथकाने कार्यालयांच्या कामकाजाची आणि व्यवस्थेची पाहणी केली.
लोकायुक्त पथकाने सरकारी कार्यालयात नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, कार्यालयातील एकूण व्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या विषयांसंदर्भात अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी बेळगाव जिल्ह्यातील लोकायुक्त अधिकारीही उपस्थित होते. लोकायुक्तांच्या या भेटीमुळे शासकीय कार्यालयांच्या कामकाजावर बारीक लक्ष ठेवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta