Tuesday , March 3 2026
Breaking News

कोरोनाच्या महामारीने खानापूर जनावराच्या बाजारात मंदी

Spread the love

खानापूर (वार्ता) : कोरोनाच्या महामारीमुळे सारा देश कोलमडला आहे. अनेक संकटे आली. त्यामुळे यातून सावरणे अवघड झाले आहे. याचा अनुभव खानापूर तालुक्याच्या जनावरांच्या आठवडी बाजारात अनुभवयास मिळाला.
जानेवारी महिन्यात अनेक रविवार हे कर्फ्यूमुळे बाजार भरू शकले नाही. त्यामुळे जनावरांची खरेदी विक्री झाली नव्हती.
रविवारी दि. 30 रोजी खानापूर येथील रूमेवाडी क्रॉसवर भरवण्यात आलेल्या जनावरांच्या आठवडी बाजारात बैल, म्हशी, गायी याची खरेदी विक्री फारच कमी प्रमाणात दिसून आली. यंदा अवकाळी पावसामुळे हातातोंडाला आलेल्या भाताचे नुकसान झाले. भात भिजून गेल्याने दर मिळाला नाही. शेतकरी वर्गाकडे पैसा आला नाही. त्यातच ऊसाची बिले वेळेत नाही. त्यामुळे जनावरे खरेदी करणे शेतकरी वर्गाला शक्य झाले नाही. त्यामुळे खरेदीवर याचा परिणाम दिसून आला.
आजच्या जनावरांच्या बाजारात गावठी दुधत्या म्हशीची किंमती 30 हजार रुपये ते 35 हजार रूपये इतकी होती. तर गाभण म्हशीची किंमत 40 हजार रुपये ते 60 हजार रुपये इतकी होती.
दुभत्या जर्शी गायीची किंमत 25हजार रूपये ते 30 हजार रूपये इतकी होती. एचएफ जर्शी गाभण गायीची किंमत 35 हजार रुपये ते 55 हजार रूपये होती. गावठी बैलजोडीची किंमत 40 हजार रुपये ते 50 हजार रूपये इतकी होती. खिलारी बैलजोडीची किंमत 55 हजार रूपये ते 70 हजार रुपये इतकी होती.
खानापूर जनावरांच्या आठवडी बाजारात बैलहोंगल, बागेवाडी, नंदगड, जांबोटी, खानापूर, गर्लगुंजी तसेच तालुक्याच्या विविध गावातून जनावरे विक्री, खरेदीसाठी जनावरे येतात.
यावेळी खानापूरचे जनावराचे दलाल संजू सडेकर म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून जनावरांच्या बाजारात कोरोनाच्या महामारीमुळे मंदी आली आहे. शेतकरी वर्गाकडे पैसा नाही. त्यामुळे जनावरे खरेदी करण्यासाठी शेतकरी पुढे येत नाही. त्यामुळे जनावरांचा बाजारात मंदी आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *