खानापूर : खानापूर तालुक्यातील तोपिनकट्टी येथील श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने खो-खो व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर 18 व 19 ऑक्टोबर रोजी सदर स्पर्धा बेळगाव जिल्हा, एक गाव एक संघ व खानापूर तालुका एका बाजूला व दुसर्या बाजूने बेळगाव तालुका याप्रमाणे खेळवण्यात येईल. तसेच यावर्षी तोपिनकट्टी गावातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 27 सप्टेंबर 2025 रोजी माजी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकारी व सभासदांच्या उपस्थितीत बैठक घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta