Tuesday , March 3 2026
Breaking News

सरन्यायाधीशांवर जोडे फेकण्याच्या निंदनीय घटनेचा खानापूर तालुका बार असोसिएशनच्या वतीने निषेध

Spread the love

 

खानापूर : सरन्यायाधीशांवर जोडे फेकण्याच्या निंदनीय घटनेचा खानापूर तालुका वकील संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. या संदर्भात खानापूर तहसीलदारांना वकील संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.

दिल्ली येथील वकील राकेश किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान भारताचे मुख्य सरन्यायाधीश माननीय श्री. बी. आर. गवई यांच्या दिशेने पायातील जोडे फेकण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा खानापूर बार असोसिएशनतर्फे तीव्र शब्दात निषेध करून निषेधाचा ठराव सर्वानुमते पास करण्यात आला व वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. खानापूर तहसीलदारांच्या वतीने निवेदनाचा स्वीकार उप तहसीलदार सोमशेखर संगोळी यांनी केला. बुधवार दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी 12 असोसिएशनच्या सभागृहात ॲड. ईश्वर घाडी यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन समिती व सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत घडलेल्या प्रकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच “देशाच्या घटनेला व न्यायालयाच्या सन्मानाला डाग आणणारी अत्यंत खेदजन कृती” या शब्दात घडलेल्या घटनेचा उल्लेख करत सर्वानुमते निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला. याप्रसंगी सदर घटनेच्या निषेधार्थ खानापूर तहसीलदारांच्या मार्फत शासनाला निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला व तहसीलदार कार्यालय वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार सोमशेखर संगोळी यांना निवेदन सादर केले. बैठकीमध्ये ॲड.पी.एन. बाळेकुंद्री यांनी निषेधाचा प्रस्ताव मांडला तर ॲड. एच.एन. देसाई यांनी अनुमोदन दिले व सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. बार असोसिएशनने प्रशासनाकडे न्यायालयीन सुरक्षा संबंधी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच बुधवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी कामकाजावर बहिष्कार घातला व कामकाजातील प्रकरणांमध्ये कोणतेही प्रतिकूल आदेश देऊ नयेत अशी विनंती देखील खानापूर न्यायाधीशांना बार असोसिएशनतर्फे करण्यात आली होती. यावेळी बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. आय आर घाडी, उपाध्यक्ष ॲड. केशव काळेकर, सचिव ॲड. एम. वाय. कदम, खजिनदार जी.जी.पाटील, ॲड. चेतन मनेरिकर, ॲड. एस.के. नंदगडी, ॲड. सिद्धार्थ कपिलेश्वरी, ॲड. सुरेश भोसले, ॲड. रुद्रगौडा पाटील, ॲड.लंगोटी, ॲड.हेरेकर, ॲड. सुरेश लोटूलकर, ॲड. स्वाती पाटील, ॲड. सुरेखा उप्पिन, तसेच बार असोसिएशनचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *