
खानापूर : खानापूर तालुक्यातील हलशीजवळील माचीगड गावात आज सोमवारी, पहाटे सुमारे 4.30 वाजता अस्वल गावातून मुक्त संचार करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज ग्रामपंचायतीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे गावातील काही महिला व मुले प्रातर्विधीसाठी घरातून बाहेर पडत असताना, त्यांनी अस्वलाला गल्लीतून पळत जाताना पाहिले. अचानक समोर रानटी अस्वल पाहून ते घाबरले आणि गावात ही बाब सांगितल्यानंतर गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
यानंतर ग्रामपंचायतीचे कार्यालय उघडताच ग्रामस्थांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता अस्वल ग्रामपंचायतीच्या समोरून जात असल्याचे दिसून आले.
या घटनांमुळे नागरिकांतून वन विभागाकडे वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करून परिसरातील जंगली प्राण्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta