Monday , September 21 2026
Breaking News

दक्षिणकाशी कपिलेश्वर येथे श्री काळभैरवनाथ जयंती महोत्सवाचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर येथील पुरातन श्री काळभैरवनाथ मंदिरात यंदा १२ नोव्हेंबर रोजी श्री काळभैरवनाथ जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी जयंतीच्या मुख्य दिवशी अभिषेक, श्री काळभैरव जन्मोत्सव, महाआरती, महापूजा, प्रसाद वाटप तसेच सायंकाळी भव्य धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

या उत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व अभिषेक करण्याची इच्छा असलेल्या भाविकांनी मंदिरात संपर्क साधावा, असे आवाहन श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *