
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक सोमवार दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक येथे सकाळी ठीक ११ वाजता बोलावण्यात आलेली आहे. सदर बैठकीत कर्नाटक राज्याच्या बेळगांव येथे ८ डिसेंबर २०२५ रोजी होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली होणार्याला महामेळाव्याला पाठींबा देण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. तरी खानापूर म. ए. समितीच्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील व श्री. निरंजन सरदेसाई, सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta