Monday , April 20 2026
Breaking News

विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन करणाऱ्या “त्या” प्राध्यापकाला श्रीराम सेना हिंदुस्थानकडून चोप

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील एका नामांकित महाविद्यालयामध्ये एचओडी म्हणून कार्यरत असणाऱ्या एका प्राध्यापकाकडून एका विद्यार्थिनीचा छळ सुरु होता. सदर प्रकरणाची तक्रार श्रीराम सेना हिंदूस्थानकडे आल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘त्या’ प्राध्यापकाला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी विद्यार्थिनीची तक्रार दाखल करुन घेऊन त्या प्राध्यापकावर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी श्रीराम सेना हिंदूस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडूसकर हे स्वतः उपस्थित होते.

सदर प्रकरणामुळे भविष्यात विद्यार्थिनीला होणारा त्रास लक्षात घेता या प्रकरणातील विद्यार्थीनीसह त्या कॉलेजचे व त्या प्राध्यापकाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

अशा प्रकारच्या घटना कोणत्याही कॉलेज अथवा ऑफिसमध्ये घडत असतील तर युवती व महिलांनी कोणताही संकोच न बाळगता तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनला अथवा श्रीराम सेना हिंदूस्थानकडे करावी असे आवाहन संघटनेने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती आणि अक्षय तृतीया निमित्त कपिलेश्वर मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास

Spread the love  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात शिवजयंती आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *