
खानापूर : बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकारकडून हिवाळी अधिवेशन बेळगाव येथील सुवर्णसौध येथे घेण्यात येते. अशी देखील कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर पासून सुवर्णसौध बेळगाव येथे होणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अधिवेशनाला विरोध म्हणून सोमवार दिनांक 8 डिसेंबर रोजी मराठी भाषिकांकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषिक नागरिक या महामेळाव्यास मोठ्या संख्येने सहभागी होणार, असा निर्धार खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई हे होते. 4 डिसेंबर रोजी होणाऱ्या “राष्ट्रवीर”कार गुरुवर्य शामराव देसाई पुरस्कार वितरण सोहळ्यास खानापूर तालुक्यातील जनतेने बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देखील करण्यात आले.

बैठकीनंतर खानापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत मेळाव्यासंदर्भात पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. त्यानंतर ज्ञानेश्वर मंदिर खानापूर येथे निवृत्त शिक्षक संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या ठिकाणी जाऊन देखील महामेळाव्यासंदर्भात समिती पदाधिकारी जनजागृती केली व 4 डिसेंबर रोजी होणाऱ्या “राष्ट्रवीर”कार गुरुवर्य शामराव देसाई पुरस्कार वितरण सोहळ्यास निवृत्त शिक्षकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस समितीचे कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, ज्येष्ठ नेते विलास बेळगावकर, खजिनदार संजय पाटील, तसेच प्रकाश चव्हाण, राजाराम देसाई, अमृत शेलार, बी. बी. पाटील, विठ्ठल निंगप्पा गुरव, प्रभाकर बिरजे, विनायक चव्हाण, जयराम देसाई, शंकर सडेकर, म्हात्रू धबाले, वसंत नावलकर, मरू पाटील, ए. एम. पाटील, डी. एम. भोसले, वाय. बी. पाटील, जे. बी. पाटील, एस. बी. पाटील, एम. जी. पाटील, सी. एल. सुतार, व्ही. एल. पाटील, विठ्ठल हट्टीकर, एम. जी. घाडी, एस. व्ही. जाधव, एम. ए. खांबले, एन. जे. गुरव, बी. एन. पाटील, एन. एम. पाटील, ए. आर. मुतगेकर, एस. एच. गुरव, जी. पी. गावडा, ए. एन. गणाचारी, जी. बी. देसाई, एन. व्ही. पाटील, एस. एम. पाटील, एल. डी. पाटील, एन. एन. पावले, नाना घाडी, आर. के. घारशी, एन. जी. गुरव, जी. डी. देसाई, व्ही. यू. देसाई, एन. के. पाटील, जी. एल. हेब्बाळकर, एन. जी. पाटील, एम. के. काकतकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta