
खानापूर : कर्नाटक विद्युत प्रसारण निगम लिमिटेडकडून तातडीच्या देखभाल व दुरुस्ती कामांमुळे खानापूर तालुक्यात सोमवार दि. 29 डिसेंबर रोजी दुपारी 1.00 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित राहणार आहे.
110 के. व्ही. खानापूर उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याने तालुक्यातील अनेक गाव व परिसरांना त्याचा फटका बसणार आहे. यामध्ये लैला साखर कारखाना, देवलत्ती, बीदरभावी, भंडरगाळी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, बरगाव, निडगल, दोड्डहोसूर, सन्नहोसूर, करंबळ, जळगा, कुप्पटगिरी, लोकोळी, लक्केबैल, यडोगा, बलोगा, जैनकोप, गांधीनगर, हलकर्णी, कोर्ट परिसर, औद्योगिक वसाहत, बाचोळी, कौंदल, झाडनावगे आदी भागांचा समावेश आहे.
या परिसरांतील घरगुती, व्यावसायिक तसेच औद्योगिक वीजग्राहकांना वीजखंडिततेचा सामना करावा लागणार आहे. आवश्यक देखभाल व दुरुस्ती कामे वेळेत पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे हेस्कॉम प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, वीजखंडिततेच्या काळात नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी व वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta