Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीचा ज्ञान व मनोरंजन कार्यक्रम उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, शोभा लोकूर, उपाध्यक्ष के. एल. मजूकर, कार्यवाह सुरेन्द्र देसाई व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते.
यावेळी शोभा लोकूर यांनी नर्मदा परिक्रमेची सविस्तर व तपशीलवार माहिती देऊन तन व मन एकत्र करून परिक्रमा केली पाहिजे असे आवर्जून सांगितले.
यावेळी नारायण कोरडे, रविद्रनाथ जुवळी, विजय बांदिवडेकर यांनी मराठी, हिंदी कन्नड गाणी व अभंग सादर केले. सुरेन्द्र देसाई यांनी स्वागत केले तर शिवराज पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *