
खानापूर : खानापूर तालुक्यातील तिवोलीवाडा (ख्रिश्चन वाडा) ते रेल्वे ब्रीज या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामास काही दिवसांपासून अडथळा निर्माण झाला होता. रस्ता रुंदीकरण व कामादरम्यान दोन शेतकऱ्यांची शेतजमीन बाधित होत असल्याच्या तक्रारीमुळे रस्त्याचे काम तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर यांनी आज स्वतः प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा केली. आपसी समन्वयाने व योग्य तोडगा काढून रस्त्याशी संबंधित समस्या सोडविण्यात आली. आमदार हलगेकर यांच्या हस्तक्षेपामुळे अडथळा दूर होऊन रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
हा रस्ता तिवोलीवाडा गावापासून ते रेल्वे ब्रिजपर्यंत होत असून, हे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे स्थानिक नागरिकांना दळणवळणासाठी मोठा फायदा होणार आहे. रस्ता पुन्हा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी आमदार हलगेकर यांचे आभार मानले.
यावेळी ग्रामस्थांनी रेल्वे ब्रिज ते तिवोली गाव या दुसऱ्या रस्त्यालाही तातडीने मंजुरी देऊन पूर्ण करावी, अशी मागणी केली. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी संबंधित रस्त्याचे कामही लवकरात लवकर मंजूर करून पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रसंगी तिवोली येथील सर्वश्री रमेश पाटील, सुभाष पाटील, सहदेव हेब्बाळकर, रुक्माण्णा लोकोळकर, प्रभाकर हेब्बाळकर, भरमाणी पाटील, तसेच तिवोलीवाडा येथील सर्वश्री फ्रान्सिस मिंगेल पिरेरा, दियेक फ्रान्सिस पिरेरा, आंतोन मतेस पिरेरा आदी उपस्थित होते.
याशिवाय गावकरी मतेस फ्रान्सिस दमेलो, बस्त्याव फ्रान्सिस मिनोज, जुवाव फ्रान्सिस सोज, दियेक फ्रान्सिस पिरेरा, जुजे फ्रान्सिस मिनोज, मतेस शानू मिनोज, फ्रान्सिस पेद्रू फर्नांडीस, फ्रान्सिस लुईस सोज यांचीही उपस्थिती होती.
Belgaum Varta Belgaum Varta