Sunday , September 20 2026
Breaking News

मराठा मंडळ संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त मराठा मंडळ फार्मसी कॉलेज येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : मराठा मंडळ फार्मासी कॉलेज, रोटरी क्लब आँफ वेणुग्राम, बेळगाव आणि केएल्ई डॉ. प्रभाकर कोरे हाँस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “रक्तदान शिबिराचे” आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास प्रमुख अथिती तसेच मार्गदर्शक म्हणून मा. शशिकांत नाईक, मा. डी. बी. पाटील, मा. प्रशांत भोंगले, डॉ. विष्णू कंग्राळकर, या उपक्रमाचे समन्वयक डॉ. महेश भानुशाली आणि के एल् ई हाँस्पिटलच्या रक्तपेढीचे डॉ. विठ्ठल माने आदी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिराला विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत ८१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
संस्थेच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले. रक्तदानाचे महत्त्व, त्यातून होणारे आरोग्यदायी फायदे तसेच गरजू रुग्णांसाठी रक्तदान किती आवश्यक आहे, याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मराठा मंडळ फार्मसी कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तपेढीच्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने शिबिरात आवश्यक ती सर्व वैद्यकीय काळजी घेतली.
मराठा मंडळच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेले हे रक्तदान शिबिर समाजोपयोगी उपक्रमाचे उत्तम उदाहरण ठरले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *