खानापूर (प्रतिनिधी) : कोडचवाडात (ता. खानापूर) येथील सर्वे नंबर ११५ मधील शिवारातील दोन एकर जमिनीतील ऊसाच्या फडाला गुरुवारी दि. ३ रोजी दुपारी २ वाजता कोडचवाडचे शेतकरी देवेंद्र बाळापा कोलेकर यांच्यात शेतातील ट्रान्सफॉर्मरात शाॅर्टसर्किटमुळे आगीची ठिणगी पडून ऊसाच्या फडाला आग लागली . त्यामुळे दोन एकर जमिनीतील जवळ पास ३०ते ४० टन ऊस जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.
घटनेची माहिती खानापूर येथील अग्नीशामक दलाला कळविण्यात आली. लागलीच अग्नीशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
तेव्हा संबंधित शेतकऱ्याला सरकारकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी कोडचवाड गावच्या ग्रामस्थांतून होत आहे.
