Tuesday , March 3 2026
Breaking News

चापगाव मराठी शाळेचा २५, २६ रोजी शतकमहोत्सव; विविध शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Spread the love

 

खानापूर : चापगाव (ता. खानापूर) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचा शतकमहोत्सव बुधवार दि. २५ व गुरुवार दि. २६ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. दि. १ फेब्रुवारी १९२६ साली स्थापना झालेल्या चापगाव मराठी शाळेच्या शतकमहोत्सव कार्यक्रमाची सुरुवात बुधवार दि. २५ रोजी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. उदघाटन समारंभ पपू चन्नबसव देवस रुद्रस्वामी मठ अवरोळी यांच्या दिव्य सानिध्यात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शतकमहोत्सव समितीचे अध्यक्ष विलास धबाले राहणार आहेत. नूतनीकृत शाळा इमारतीचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री सतीश जारकीहोळी व आमदार यांच्या हस्ते होणार आहे. प्रवेशद्वार उदघाटन माजी आमदार अरविंद पाटील, ग्रंथदिडी उ‌द्घाटन माजी आमदार दिगंबर पाटील व माजी आमदार अंजली निंबाळकर करणार आहेत. संगणक कक्ष उ‌द्घाटन किरण ठाकुर सल्लागार संपादक तरुण भारत यांच्या हस्ते होणार आहे.

दुपारी २.३० ते ४ यावेळेत व्याख्याते गणेश शिंदे यांचे मातृभाषेचे महत्व व संस्काराची गरज या विषयावर व्याख्यान होणार आहे. सायं. ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी ग्रा. पं. अध्यक्ष रमेश पवाले यांच्या अध्यक्षतेखाली आहे.

गुरुवारी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

गुरुवार दि. २६ रोजी सकाळी १० वाजता माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व सत्कार समारोह आयोजिला असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष मष्णू चोपडे राहणार आहेत. गुरुवारी सायंकाळी ६ ते ९ या सत्रात प्राथमिक, माध्यमिक विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *